मेजर प्रदीप ताथवडे यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय : कर्नल सतवानेकर.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:38 AM2020-12-17T04:38:19+5:302020-12-17T04:38:19+5:30
केंदूर (ता. शिरूर) येथील किर्तीचक्र प्राप्त शहिद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या स्मारक पुतळ्याचे अनावर कर्नल वेटनर मंदार सतवानेकर यांच्या ...
केंदूर (ता. शिरूर) येथील किर्तीचक्र प्राप्त शहिद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या स्मारक पुतळ्याचे अनावर कर्नल वेटनर मंदार सतवानेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कर्नल प्रदीप ढोले, कर्नल महेंद्र पाटील, चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस, कर्नल मधुकर कदम, सदाशिव थिटे, भाऊसाहेब साकोरे, सुभाष उमाप, प्रमोद पऱ्हाड, बी.जी. पाचर्णे आदिंसह आजी - माजी सैनिक, पदाधिकारी व केंदूरकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्नल सतवानेकर म्हणाले, सीमेवर देशाचे रक्षण करताना मेजर ताथवडे यांनी जीवाची पर्वा न करता तीन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. दुर्दैवाने या हल्ल्यात त्यांना वीरगती प्राप्त झाली. अशा या धाडसी सैनिकाच्या पुतळ्याचे "विजयदिनी" अनावरण होत आहे. म्हणून त्यांना आमचा सलाम. दरम्यान तीर्थक्षेत्र वढू येथून गावातील तरुणांनी शिवज्योत प्रज्वलित करून स्मारकात आणण्यात आली. तर सैनिकांच्या तुकडीने मेजर ताथवडे यांना सलामी देत श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबासाहेब पऱ्हाड तर पांडुरंग ताथवडे यांनी आभार मानले.
१६ शेलपिंपळगाव
किर्तीचक्र प्राप्त शहिद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या पुतळ्याचे अनावर करताना कर्नल वेटनर मंदार सतवानेकर व अन्य मान्यवर.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)