‘क्रिप्टो’च्या फसवणुकींमध्ये आयटी तरुणांचे माेठे प्रमाण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 06:48 AM2023-04-24T06:48:32+5:302023-04-24T06:49:11+5:30
विशेष म्हणजे, येणाऱ्या तक्रारींमध्ये आयटी क्षेत्रातील तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोन ॲप, सेक्स्टॉर्शन, वीजबिल फ्रॉड, ऑनलाइन फ्रॉड अशा अनेक मार्गाने सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले असताना आता क्रिप्टोकरन्सी संबंधातील फसवणुकींच्या गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पुणे शहर सायबर पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डनुसार आठवड्यात दोन ते चार क्रिप्टोकरन्सी संदर्भातील फसवणुकीच्या तक्रारी आणि पाच लाखांपासून करोडो रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत.
विशेष म्हणजे, येणाऱ्या तक्रारींमध्ये आयटी क्षेत्रातील तरुणांचा समावेश अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोशल मीडिया ग्रुपवर तुम्हाला ॲड केले जाते. त्यानंतर तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी जॉयनिंग बोनस म्हणून ५०० ते एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये पाठवली जाते. त्याच ग्रुपमधील व्यक्तीचा फोन येतो आणि तुमचे क्रिप्टो अकाउंट बनवण्यात येते. प्रोसेसिंग फी, सरकारी फी, टीडीएस अशा गोष्टींच्या नावाखाली पैसे उकळले जातात.