बाजारात मकर संक्रांतीची लगबग, आकर्षक तिळगुळ व भोगीचे साहित्य खरेदीची लगबग
By अजित घस्ते | Published: January 11, 2024 07:54 PM2024-01-11T19:54:23+5:302024-01-11T19:56:56+5:30
मकर संक्रातीच्या व भोगीच्या निमित्ताने मार्केटयार्ड येथे आकर्षत होलसेल तिळगुळ व भोगीसाठी लागणा-या पालेभाज्यासाठी बाजारात ग्राहक खेरदीची लगबग सुरू झाली आहे....
पुणे : भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा असलेला नवीन वर्षातील पहिला सण असणाऱ्या मकरसंक्रांतीसाठी तिळगुळ, हळदी - कुंकवाच्या वस्तूसह वाणाचे साहित्य खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठां सजल्या असून यामध्ये महिला वर्गाची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मकर संक्रातीच्या व भोगीच्या निमित्ताने मार्केटयार्ड येथे आकर्षत होलसेल तिळगुळ व भोगीसाठी लागणा-या पालेभाज्यासाठी बाजारात ग्राहक खेरदीची लगबग सुरू झाली आहे.
गुरूवारी मार्केटयार्डात भोगीच्या दिवसात मिक्स लागणा-या भाज्यांची आवक मोठया प्रमाणात होत आहे. थंडी आणि भोगी या सणाचे औचित्य साधून भोगी सणाला खास मिक्स भोगीची भाजी बनवली जाते. भोगी सणाला लागणा-या भाज्यांची मार्केटयार्डात आवक सुरू असून भाज्यांची आवक वाढली आहे. यामध्ये सोलापूर,नगर, इंदापूर,बार्शी, पाथर्डी भागातून शेतकरी माल घेवून येत आहेत.यामध्ये मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरबरा, तीळ आदी या सर्व भाज्या एकत्र करून भाजी करून भोगी साजरी केली जाते. तर तीळ आणि गुळापासून तीळलाडू देवून स्नेह गुण वाढवणारा सण म्हणजेच मकरसंक्रांत.यासाठी रंगीत तीळगुळच्या विविध प्रकराचे तीळ बाजारात दाखल झाल्याने ग्राहाकांना आकर्षक ठरत आहे. खरेदीसाठी नागरिकांनी लगभग सुरू आहे..
यंदा अवेळी पावसामुळे तीळ उत्पादन कमी झाल्याने शेतक-यांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे. मागील वर्षीपेक्षा ४० टक्के उत्पान बाजारात आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाल्याने मागील वर्षीपेक्षा यंदा तीळामध्ये ५० ते ६० रूपये प्रतिकिलो दर वाढले आहे.
- अजित बोरा, व्यापारी तीळ होलसेल
सध्या मार्केटयार्डात सोलापूर, नगर, इंदापूर, बार्शी, पाथर्डी भागातून शेतकरी माल घेऊन येत आहेत. यामध्ये मटार, गाजर, वांगी, घेवडा, वालाच्या शेंगा, हरभरा गड्डी या भाज्यांची आवक मोठया प्रमाणात होत आहे. यामध्ये वांगी, हरभरा, गाजर, मटार आदी मागणी वाढली आहे.
- रघूनाथ येदोवते, व्यापारी फळभाज्या