मकर संक्रांतीच्या तोंडावर शेतकऱ्यांवर ‘संक्रांत’
By admin | Published: January 6, 2017 06:21 AM2017-01-06T06:21:42+5:302017-01-06T06:21:42+5:30
मकर संक्रांत जवळ आली असतानादेखील शेतमालाला बाजारभाव मिळत नाही; त्यामुळे शेतकऱ्यांवरच संक्रांत आल्याचे चित्र आहे
काऱ्हाटी : मकर संक्रांत जवळ आली असतानादेखील शेतमालाला बाजारभाव मिळत नाही; त्यामुळे शेतकऱ्यांवरच संक्रांत आल्याचे चित्र आहे. अखेर तरकारी पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एवढी भयानक परिस्थितीचा सामना करण्याची वेळ बळीराजावर पहिल्यांदाच आली आहे, अशी चर्चा बारामती तालुक्यातील शेतकरी करतात.
कांदा, टोमॅटो, घेवडा, पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर, पावटा आदी भाजीपाल्याला विक़्रीसाठी घेऊन गेलेला खर्चदेखील निघत नाही. इतरांकडून घेतलेले हातउसने पैसे
कसे परत करायचे? प्रपंचाचा गाडा कसा हाकायचा? या विचाराने शेतकरी आता ग्रासला गेला आहे. शेताची मशागत, बियाणे, औषधफवारणी, वीजबिल,
शेतात दिवसरात्र राबून शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही.
मकर संक्रांतीच्या तोंडावर शेतकऱ्यांवरच संक्रांत आली असल्याचे माळवाडी (लोणी) येथील शेतकरी शारदा लोणकर यांनी सांगितले. (वार्ताहर)