शिरूरमध्ये मकरसंक्रात उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:23+5:302021-01-16T04:14:23+5:30

सणानिमित्त महिला वर्गात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. दुपारनंतर ग्रामदैवत श्री संतराज महाराज मंदिर व परिसरात ओवसा देण्यासाठी आणि ...

Makar Sankrat celebrated in Shirur | शिरूरमध्ये मकरसंक्रात उत्साहात साजरी

शिरूरमध्ये मकरसंक्रात उत्साहात साजरी

Next

सणानिमित्त महिला वर्गात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. दुपारनंतर ग्रामदैवत श्री संतराज महाराज मंदिर व परिसरात ओवसा देण्यासाठी आणि देवाचे दर्शन घेण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. रामाचा औसा, सीतामाईचा औसा म्हणत, महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू लावून वाणवसा दिला. महिलांनी या निमित्त विविध आभूषणे परिधान केली होती. नवीन पद्धतीच्या तयार नऊवारी साड्या, सहावार साड्या, विविध प्रकारचे दागिने, तसेच हातात ओवसण्याचे ताट घेऊन त्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, बोरे, ज्वारी आणि गव्हाची कणसे, तीळगूळ, हळदी-कुंकू घेऊन देवाला ओवसण्यात आले.

त्याचप्रमाणे, गावातील मारुती मंदिर, शनी मंदिर, ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात महिलांनी मोठी गर्दी केली होती.

कोरोना लॉकडाऊननंतर श्री संतराज महाराज बेट वाळकी रांजणगाव सांडस या भागात मकर संक्रांतीनिमित्त महिला वर्गाने व सण यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

श्री संतराज महाराज वाळकी रांजणगाव सांडस बेट परिसरात महिलांनी मकरसंक्रांतनिमित्त औसा कार्यक्रम साजरा केला.

Web Title: Makar Sankrat celebrated in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.