शेतीपूरक प्रकल्प बनवा : मंगेश भास्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:55+5:302021-09-04T04:15:55+5:30
कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी समर्थ शैक्षणिक संकुलाला भेट दिली. कृषितज्ज्ञ या नात्याने पाहणी करताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शेतीपूरक गोष्टीवर भर ...
कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी समर्थ शैक्षणिक संकुलाला भेट दिली. कृषितज्ज्ञ या नात्याने पाहणी करताना अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शेतीपूरक गोष्टीवर भर देऊन समाजासाठी आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन या वेळी त्यांनी केले.
कृषी क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात अनेकविध समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागते. त्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करणारे, कमी खर्चात व वास्तववादी स्वरूपातील प्रकल्प अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार करावेत. जेणेकरून त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होईल तसेच प्रतिवर्षी समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना कृषीपूरक प्रकल्पाविषयी विशेष कार्यशाळाचे आयोजन करणार असल्याचे मंगेश भास्कर यांनी सांगितले.
संकुलातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी तयार केलेले प्रकल्प व त्याविषयी माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली. यावेळी शेतीतज्ञ बाबाजी नेहरकर, मारुती बोरचटे, भूषण औटी, संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, गुंजाळवाडी गावचे सरपंच लहू गुंजाळ, प्रशांत गावडे, सुरेश बोरचटे आदी उपस्थित होते.