पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वाॅर्ड करा : डॉ़ नीलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:12 AM2021-09-03T04:12:20+5:302021-09-03T04:12:20+5:30

पुणे : कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महापालिकेनेही कोरोनामुक्त वार्ड करावेत, अशा ...

Make Coronamukta Ward a Pioneer Project: Dr. Neelam Gorhe | पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वाॅर्ड करा : डॉ़ नीलम गोऱ्हे

पथदर्शी प्रकल्प म्हणून कोरोनामुक्त वाॅर्ड करा : डॉ़ नीलम गोऱ्हे

Next

पुणे : कोरोनामुक्त गाव या उपक्रमाप्रमाणे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, पथदर्शी प्रकल्प म्हणून पुणे महापालिकेनेही कोरोनामुक्त वार्ड करावेत, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत़

डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महापालिकेत गुरुवारी कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कामांची आढावा बैठक झाली़ यावेळी त्यांनी महापालिकेच्या नावीन्यपूर्ण कामाचा आढावा घेतला़ तसेच कोरोनाच्या काळात सामान्य नागरिक, कामगार, मजूर यांना मदत देण्यासाठी शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या योजनांचा आढावाही घेतला़ बैठकीस महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, गटनेते पृथ्वीराज सुतार, आयुक्त विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, ज्ञानेश्वर मोळक यांच्यासह अन्य पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गोऱ्हे यांनी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने महापालिका कार्यक्षेत्रात घरेलू कामगार, बांधकाम कामगार, रिक्षाचालक आदींना ३० कोटी रुपयांचा मदतनिधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले़ कोरोनामुळे निधन झालेल्या पालिकेतील ८८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर प्रलंबित नियुक्त्या तत्काळ द्याव्यात, महिला बालविकास विभागाने कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याने ४०७ विधवा महिलांचे पुर्नवसन करावे व या कार्यवाहीचा अहवाल १५ आॅक्टोबरपर्यंत सादर करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले़

महापालिकेच्या सर्व कर्मचा-यांना ७ वेतन आयोग लागू करण्यासाठी शासन स्तरावरून मान्यता देण्यासाठी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही डॉ. गो-हे यांनी सांगितले़

----------------------------

---------------------------

Web Title: Make Coronamukta Ward a Pioneer Project: Dr. Neelam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.