राष्ट्रवादीने केलेली कामे लोकांपर्यंत पाेहोचवा : सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:11 AM2021-09-19T04:11:39+5:302021-09-19T04:11:39+5:30
यवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब ...
यवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, कुंडलिक खुटवड, भाऊसाहेब ढमढेरे, नितीन दोरगे, मयूर दोरगे, आबा दोरगे, सदानंद दोरगे, दिलीप यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, दौंड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसविषयक चांगले वातावरण आहे. लोकांमधील हाच विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी यावेळी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
यवत येथे स्टेशन रस्त्याच्या लगत राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय सुरू झाले असून भविष्यात यवत व दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माजी आमदार रमेश थोरात व तालुक्याचे युवा नेते तुषार थोरात आठवड्यातून ठराविक दिवशी कार्यालयात उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवड यांनी दिली. दिलीप हंडाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
180921\img-20210915-wa0031.jpg
फोटो ओळ :- यवत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्धघाटन करताना खासदार सुप्रिया सुळे , माजी आमदार रमेश थोरात , आप्पासाहेब पवार , कुंडलिक खुटवड , तुषार थोरात आदी मान्यवर