म्युकरमायकोसिस रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शन्सची लेखी मागणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:36+5:302021-05-21T04:12:36+5:30
पुणे : गेल्या काही दिवसांत कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यात तीनशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली असून, ...
पुणे : गेल्या काही दिवसांत कोरोनासोबतच म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. पुणे जिल्ह्यात तीनशेपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली असून, या रुग्णांसाठी लागणाऱ्या Amphotericin B इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळेच सर्व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी रेमडेसिविरप्रमाणे म्युकरमायकोसिस इंजेक्शनचे नियंत्रण देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. यामुळेच ज्या सर्व खासगी हाॅस्पिटलमध्ये दोन्ही इंजेक्शनसाठी
जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच म्युकरमायकोसिसचे रुग्ण मात्र वाढत असताना दिसत आहेत. आठ-दहा दिवसांत म्युकरमायकोसिस रुग्णांनी तीनशेचा टप्पा पार केला आहे. ही रुग्णसंख्या वाढत असतानाच यासाठी आवश्यक असलेल्या Amphotericin B इंजेक्शनची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळेच शासनाने रेमडेसिविर इंजेक्शन्स प्रमाणे म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन्सचे नियंत्रण व वितरण करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली.
--------------
अन्न व औषध विभागाच्या नेतृत्वाखाली नियंत्रण कक्ष स्थापन
पुणे जिल्ह्यासाठी दररोज प्राप्त होणाऱ्या इंजेक्शन्स व्हायल्स व त्याचे वितरण यासाठी अन्न व औषध विभागाच्या नेतृत्वाखाली नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणाऱ्या Amphotericin B च्या साठ्याबाबत नियंत्रण कक्षप्रमुख अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त श्याम प्रताप पुणे जिल्ह्यातील पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, कॅन्टोन्मेंट क्षेत्र व पुणे ग्रामीणमधील रुग्णांची दैनंदिन यादी निश्चित करून डिस्टिब्युटर / स्टॉकिस्ट यांचे मार्फत संबंधित खासगी रुग्णालयास वितरणाबाबत जबाबदारी देण्यात आली आहे.