...त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले; ज्येष्ठ नेते शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 03:09 PM2024-03-22T15:09:38+5:302024-03-22T15:09:56+5:30
छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला
बारामती : बारामती शहर आणि तालुका दोन गोष्टींसाठी पुर्वीपसुन प्रसिध्द आहे. काळ्या आईची सेवा करणारा कष्टकरी शेतकरी, ज्या शेतकऱ्याने कष्टाने शेती उत्पादन वाढवलं. कारखानदारी उभी करुन लोकांच जीवन समृध्द केले. शेती जशी संपन्न होते. तसा व्यापार वाढतो. बाजारात खरेदी करण्याची ताकत वाढली की व्यापार समृध्द होतो. त्यामुळे बारामती व्यापारी केंद्र बनले असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
बारामती येथे आयोजित स्वाभिमानी व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी पवार पुढे म्हणाले, त्या काळात बारामतीत कापसाच्या जीन बघायला मिळायच्या. आपल्या भागात कापूस आणि गुळाची बाजारपेठ होती. माळेगांव, सणसरचा कारखाना झाल्यानंतर गुऱ्हाळे बंद झाली. साखर आल्यानंतर बाजारपेठ वाढली. लोकांची क्रयशक्ती वाढली. देश आणि राज्य पुढे जाण्यासाठी व्यापार वाढला पाहिजे. बारामतीत व्यापार संघटना अनेक वर्ष काम करते. पण यामध्ये छोट्या लोकांचा विचार नव्हता. हे आज लक्षात आले. छोटे व्यापारी गावाची अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी हातभार लावतात. या छोट्या व्यावसायिकांच्या अडचणीत संघटना प्रमुखांनी लक्ष घाला. काही अडचणी असल्याच आमच्याशी संपर्क साधा. निवडणुकीची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर या व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक घेऊ असं पवार म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी लढाइ कोणाशी नाही. महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचे पाप करणाऱ्या अदृश्य शक्तीशी माझी लढाइ असल्याचे सुळे यांनी सांगितले. यावेळी संयोजक आणि मनसे प्रदेश उपाध्यक्ष अॅड सुधीर पाटसकर यांनी हा मेळावा होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले, दमदाटीचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. तसेच संयोजक विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी बारामतीत ठराविक ठेकेदारांनाच ‘अबोव्ह’ ने टेंडर दिले जात असल्याचा आरोप केला. बारामतीत मोठी दडपशाही सुरु असल्याचा आरोप सस्ते यांनी देखील केला. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत लक्ष घालण्याची मागणी केली.
यावेळी सदाशिव सातव, अॅड संदीप गुजर, सतीश खोेमणे, सत्यव्रत काळे, पाैर्णिमा तावरे ,निलेश कोठारी आदी उपस्थित होते.
नमो महारोजगार मेळाव्यात ४३ हजार जणांना रोजगार देणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात १० हजार जणांनाच नोकऱ्या दिल्या. त्या नोकऱ्या देखील ८ मे पर्यंतच दिल्या आहेत का,ते ‘चेक’ करा. अॅप्रेंटीसशिप नोकर्या दिल्या आहेत का, एवढा खर्च करुन पदरात काय पडले, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. लोकांना असं बऱ्याच वेळा वाटत आता काय, पण आता काही नाही. एकदा निर्णय घेतला. कोणीतरी आपल्याकडुन काढुन घेतल. किती दिवस आता रडत बसायच नाही. माझ्या आत्याचे स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल. ‘साहेबां’नी सरोज पाटील यांना सांगितले, शारदाबाई पवार यांनी आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं. त्यामुळे झाल गेले ‘इटस ओके’. मागितले असते तर सगळं प्रेमाने दिले असते. कारण देण्यात जी मजा आहे, ती घेण्यात नाही. कोणी आदराने प्रेमाने काही मागितले ते देण्याची आपली देणारी संस्कृती आहे. मी स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. दमदाटी करुन काढुन घेतलं तर इच्छा असेल तरी देणार नाही, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.