Pune: चेष्टा करणे पडले महागात! तरुणावर थेट कोयत्याने वार, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 13:07 IST2023-06-17T13:06:48+5:302023-06-17T13:07:43+5:30
ही घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली...

Pune: चेष्टा करणे पडले महागात! तरुणावर थेट कोयत्याने वार, पुण्यातील घटना
पुणे : चेष्टा केल्याच्या रागातून टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केला. ही घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना बुधवारी अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
या मारहाणीत आदित्य राजेंद्र बर्डे (२२) आणि त्याचा भाऊ ऋषी (दोघे रा. संतोषनगर, कात्रज) हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य विशाल गोसावी (२०) आणि ओम चंद्रकांत सावंत (१८, दोघे रा. धनकवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आदित्यने मंगळवारी रात्री मित्रांसोबत चहा पित असताना एका अल्पवयीन मुलाची चेष्टा केली. त्यावरून वाद झाला. त्यामुळे आरोपींनी आदित्यला मारहाण केली. तसेच ऋषी याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले.