सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अडीच हजाराहून अधिक नागरिकांना पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 07:22 PM2018-11-24T19:22:14+5:302018-11-24T19:24:22+5:30

पुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

making public space dirty cost heavy to many | सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अडीच हजाराहून अधिक नागरिकांना पडले महागात

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे अडीच हजाराहून अधिक नागरिकांना पडले महागात

Next

पुणेपुणे महानगरपालिकेच्या घणकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या नागरिकांवर कठाेर कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत. त्यानुसार 2 नाेव्हेंबर ते 23 नाेव्हेंबर या दरम्यान पालिकेकडून तब्बल 2858 नागरिकांवर कारवाई करण्यात आली अाहे. त्यांच्याकडून 5 लाख 29 हजार 635 रुपये इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे.
 
    सार्वजनिक ठिकाणी नागरिकांंकडून अनेकदा अस्वच्छता पसरवली जाते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांची संख्या तर सर्वाधिक अाहे. या अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांमुळे शहर विद्रुप हाेत असते. पुणे शहराचे घाेषवाक्य हे स्वच्छ पुणे सुंदर पुणे असे अाहे. त्यामुळे हे घाेषवाक्य सत्यात उतरविण्यासाठी पुणे महानगरपालिका अाता सज्ज झाली अाहे. पालिकेकडून अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर अाता दंडात्मक कारवाई करण्यात येत अाहे. त्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा फेकणे, लघवी करणे, शाैचास बसणे अादी गाेष्टींसाठी कारवाई करण्यात येत अाहे. महापालिकेकडून माेहिमच हाती घेण्यात अाली असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही स्वच्छता माेहिम राबविण्यात येत अाहे. पालिकेकडून 2 नाेव्हेंबर ते 23 नाेव्हेंबर या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 1713 नागरिकांवर कारवाई करण्यात अाली अाहे. त्यांच्याकडून 2 लाख 97 हजार 165  इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. तसेच या सर्व नागरिकांकडून चक्क रस्ता साफ करुन घेण्यात अाला. याच कालावधित सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या 1101 नागरिकांकडून तब्बल 2 लाख 24 हजार 660 इतका दंड वसूल करण्यात अाला. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणाऱ्या 42 जणांकडून 6 हजार 810 तर शाैचास बसणाऱ्या 2 जणांकडून एक हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. 

    याबाबत बाेलताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, दाेन नाेव्हेंबरपासून पालिकेच्या घणकचरा व्यवस्थापन विभागाकडून शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत अाहे. सध्या 6 लाखापर्यंत दंड वसूल करण्यात अाला आहे. दंड हा प्रतिकात्मक अाहे. नागरिकांमध्ये जागृती व्हावी व त्यांनी पुण्याला स्वच्छ ठेवण्यास पालिकेला मदत करावी याहेतूने ही माेहिम हाती घेण्यात अाली आहे. लक्ष्य स्वच्छ पुणे सुंदर पुणे या माेहिमेसाठी सध्या तब्बल 750 अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या अाहेत. सध्या सुरु असलेल्या कारवाईमुळे शहरात चांगलाच गुणात्मक फरक पडलेला दिसून येत अाहे. यापुढील काळात देखिल ही कारवाई अशीच सुरु राहणार अाहे. नागरिकांना अावाहन अाहे की त्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवावी तसेच घरातील कचरा पालिकेकडून नेमण्यात अालेल्या स्वच्छ संस्थेच्या कर्मचाऱ्यांना अाेला व सुका असा वेगळा करुन द्यावा. तसेच ज्यांच्या घरी हे स्वच्छचे कर्मचारी कचरा घेण्यासाठी येत नाहीत त्यांनी त्यांच्या घराजवळील अाराेग्य काेठीला भेट देऊन याबाबतचा अर्ज करावा. 

Web Title: making public space dirty cost heavy to many

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.