माळेगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:11 AM2021-04-28T04:11:25+5:302021-04-28T04:11:25+5:30
माळेगाव : बारामती शहरापाठोपाठ माळेगाव येथील कोविड केअर सेंटरमधे मोफत आरटीपीसीआर चाचणी सुरु करण्यात आल्याची माहिती तालुका ...
माळेगाव : बारामती शहरापाठोपाठ माळेगाव येथील कोविड केअर सेंटरमधे मोफत आरटीपीसीआर चाचणी सुरु करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. दररोज सकाळी नऊ ते बारा यादरम्यान नोंदणी होणार आहे. तातडीने चाचणी घेण्यात येणार आहे.
तसेच, तालुक्यातील निंबूत व मोरगाव येथे देखील मोफत आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरु करण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामस्थांना आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी मेडिकल कॉलेज अथवा सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल येथे जावे लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा खर्च होत होता. तसेच तालुक्यातील शेवटच्या टोकावरून ग्रामस्थांना यावे लागत होते. या ठिकाणी खूप गर्दी होत असल्याने बराच वेळ ताटकळत थांबावे लागत होते, तर कधीकधी दुसऱ्या दिवशी नंबर येत होता. आता या चाचणी केंद्रामुळे ग्रामस्थांची गैरसोय टळणार आहे.
तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय अलगुडे, तेजस्वी पोळ, हमीद पठाण, रेश्मा शेख, गौरव खोमणे यांचे पथक नेमले आहे. दरम्यान, या कोविड सेंटरची माळेगाव नगरपंचायतीकडून सॅनिटायझर फवारणीसह परिसराची स्वच्छता करण्यात आल्याची माहिती सुपरवायझर सुरेश सावंत यांनी दिली आहे.
——————————————
आरटीपीसीआर चाचणीचा फायदा माळेगाव, माळेगाव खुर्द, पणदरे, धुमाळवाडी, पवईमाळ, कुरणेवाडी, म्हसोबावाडी, ढाकाळे, सोनकसवाडी, खामगळवाडी, कोऱ्हाळे आदी गावांतील ग्रामस्थांना होणार आहे. या मोफत चाचणीचा लाभ सर्वांनी घ्यावा.
नवनाथ शिंदे- आरोग्य सेवक
—————————————————
फोटो ओळी : माळेगाव येथील कोविड केअर सेंटर येथे आरटीपीसीआर चाचणीस सुरुवात करण्यात आली आहे.
२७०४२०२१-बारामती-०८
————————————————