माळेगाव कारखान्याच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:11 AM2021-07-31T04:11:09+5:302021-07-31T04:11:09+5:30
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बन्सीलाल विलास आटोळे यांची एका वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...
माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी बन्सीलाल विलास आटोळे यांची एका वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आटोळे कुटुंबातील तिसऱ्या पिढीला मान मिळाल्याने खांडज (ता. बारामती) ग्रामस्थांनी जल्लोष केला.
कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्तपदावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी ही निवड जाहीर केली. निवडीनंतर कारखान्याचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष आटोळे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे, त्यास पात्र राहून मी शेतकरी सभासद, गेटकेनधारक व कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
या वेळी कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, मावळते उपाध्यक्ष तानाजी कोकरे,संचालक मदन देवकाते,मंगेश जगताप,संजय काटे,प्रताप आटोळे,योगेश जगताप, संजय काटे, राजेंद्र ढवाण, गुलाबआप्पा देवकाते, अनिल तावरे, लालासो खलाटे, नितीन सातव,तानाजी देवकाते, सागर जाधव, महिला संचालक संगीता कोकरे व कारखान्याचे अधिकारी,कामगार उपस्थित होते.
दरम्यान, विद्यमान उपाध्यक्ष आटोळे यांच्या कुटुंबातील त्यांचे आजोबा नामदेव आटोळे,चुलते रामदास आटोळे यांनी कारखान्याचे उपाध्यक्षपद भूषविले आहे.
माळेगाव कारखान्याचे नूतन उपाध्यक्ष बन्सीलाल आटोळे यांचा सत्कार करताना अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि अन्य.
३००७२०२१ बारामती—०६