माळेगावला मिळाले नवीन नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:10 AM2021-05-18T04:10:14+5:302021-05-18T04:10:14+5:30
माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत घोषित झाल्यानंतर, ग्रामपंचायत इमारतीचे ‘नगरपंचायत माळेगाव’ असे नामकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वांत ...
माळेगाव : बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायत घोषित झाल्यानंतर, ग्रामपंचायत इमारतीचे ‘नगरपंचायत माळेगाव’ असे नामकरण करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या माळेगावला आता बदल झालेले नवीन नाव मिळाले आहे.
ग्रामपंचायत अस्तित्व संपुष्टात येऊन तिचे नगरपंचायतमधे रुपांतर करण्यात आले आहे. नगरपंचायत पंचायतीची निवडणूक होणे बाकी असून, प्रशासक म्हणून तहसीलदार विजय पाटील हे कामकाज पाहात आहेत. माळेगावचे ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज आहे. तत्कालीन सरपंच दिलीप तावरे यांनी या कार्यालयाचा कायापालट केला होता. या कार्यालयावर ग्रामपंचायत माळेगाव असे स्टिलच्या अक्षराने ठळक उल्लेख केला होता. या नावात बदल करून नगरपंचायत पंचायत असे कार्यालयाचे नामकरण करण्यात आले आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे म्हणाले की, माळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे.शासन दरबारी नगरपंचायत म्हणून माळेगावची नोंद झाली आहे. यामुळे ग्रामपंचायत माळेगावऐवजी नगरपंचायत माळेगाव असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, नगरपंचायत म्हणून माळेगावाची नव्याने ओळख निर्माण झाली आहे. नव्या नगरपंचायतची निवडणूक झाली नाही. अनेकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.मात्र, कोविडचे संकट असल्याने निवडणुका घेता येत नाहीत. गेली सहा महिन्यांपासून प्रशासक काम पाहात आहेत.
——————————————
फोटो ओळी- माळेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचे नगरपंचायत माळेगाव असे नामकरण करण्यात आले आहे.
१७०५२०२१ बारामती—०१