मळगंगा कोविड सेंटर तीर्थक्षेत्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याच्या मुळे आरोग्य मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:11 AM2021-05-23T04:11:03+5:302021-05-23T04:11:03+5:30
मळगंगा देवी पर्यटन व तीर्थस्थळ टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील १०० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आज माजी आमदार ...
मळगंगा देवी पर्यटन व तीर्थस्थळ टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील १०० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आज माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार लैला शेख या प्रमुख पाहुण म्हणून उपस्थित होत्या.यावेळी शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे, आरोग्य अधिकारी दामोधर मोरे, घोडगंगाचे उपाध्यक्ष रंगनाथ थोरात, माजी उपसरपंच सोपानराव भाकरे, तुकाराम उचाळे, सखाराम खामकर, दौलत भाकरे, ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे, वडनेरचे सरपंच नवनाथ निचित, उपसरपंच विक्रम निचित, टाकळीकर दिंडी मंडळाचे अध्यक्ष सुभाष गावडे, शिवाजी कांदळकर, प्रभाकर खोमणे, प्राचार्य आर. बी. गावडे उपस्थित होते .
यावेळी तहसीलदार शेख म्हणाल्या की, जनतेने आरोग्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण कोरोना जवळ जाईल असे कृत्य करू नये पुढील तिसरी लाट ही बालकांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे जनतेने गांभीर्याने घेतले पाहीजे. एका कुटुंबामधील व्यक्ती गेल्यानंतर ती पोकळी भरून येत नाही.
प्रारंभी प्रभाकर खोमणे यांनी स्वागत केले. आर. बी. गावडे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र गावडे यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : २२टाकळी हाजी कोरोना सेंटर
फोटो : टाकळी हाजी येथील मळगंगा देवी कोविड सेंटरचे उद्घाटन करताना माजी आमदार पोपटराव गावडे, तहसीलदार लैला शेख, मानसिंग पाचुंदकर, सुनीता गावडे, राजेंद्र गावडे