...तर आपणास मल्हार सेना महाराष्ट्रात फिरू देणार नाही :‘राष्ट्रवादी’च्या प्रदेशाध्यक्षांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 09:30 PM2019-06-28T21:30:24+5:302019-06-29T17:56:46+5:30
धनगर समाज कृती समितीच्या इंदापुर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या काळात धनगर समाजाविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध केला आहे.
पुणे (बारामती ) :धनगर समाज कृती समितीच्या इंदापुर शाखेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या काळात धनगर समाजाविषयी केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा निषेध केला आहे. समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकरांची मल्हार सेना आपणांस महाराष्ट्रात फिरू देणार नाही ,असा इशारा देखील पाटील यांना देण्यात आला आहे.
अधिवेशन काळात जयंत पाटील यांनी विधान भवनात अधिवेशनात जाणीवपूर्वक नियोजनबद्धपणे राज्यातील समस्त धनगर समाजाला अवमानित आकारण्याच्या हेतूने समाजाला शेळ्या मेंढ्या म्हणून संबोधले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या व नेत्याच्या मनात तमाम धनगर समाजाबद्दल असणारा राग व तिरस्कार व्यक्त केला आहे. त्यांनी केलेले हे विधान समाजाच्या भावना दुखावणारे आहे. समाजाला जनावरांची उपाधी देवून संपूर्ण राज्याचे लक्ष असणाराचा विधान भवनात केलेले हे वक्तव्य निषेधार्थ आहे. जयंत पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये वाडी -वस्तीवरती जाहीर निषेध चालू आहे. तरी जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमासमोर जाहीर माफी मागावी. धनगर समाजाबददल केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक आहे ,की राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे हे मत आहे. याचा खुलासा करावा. आत्तापर्यंत आमच्या समाजाला आरक्षणाच्या नावाखाली भोळ्या प्रामाणिक समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेवून कसे गंडवले , याची प्रचीती त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आली आहे.
सध्या आपण माहिती तंत्रज्ञानाच्या यात आहात याची जाणीव ठेवावी. आमच्या समाजाविषयी बोलताना जबाबदारीने बोलावे. अन्यथा आपणांस धनगर समाजातील सरसेनापती मल्हारराव होळकरांची मल्हार सेना आपणांस महाराष्ट्रात फिरू देणार नाही ,असा इशारा पाटील यांना देण्यात आला आहे.
... जंक्शन येथे जोडे मारो आंदोलन
दरम्यान या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी जंक्शन (ता. इंदापूर) येथील अहिल्याबाई चौकात शनिवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता आमदार जैन पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.