माळीणची घरे मे २०१६ अखेरीस साकारणार

By admin | Published: September 21, 2015 10:48 PM2015-09-21T22:48:16+5:302015-09-21T22:48:16+5:30

माळीण दुर्घटनेत ज्याला एक रुपयादेखील मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना लोकसहभागाची रक्कम भरण्याची आर्थिक झळ लागू देणार नाही याची व्यवस्था केली जाईल.

Malini's house will be set to end in May 2016 | माळीणची घरे मे २०१६ अखेरीस साकारणार

माळीणची घरे मे २०१६ अखेरीस साकारणार

Next

घोडेगाव : माळीण पुनर्वसनासाठी ८६६ चौरस फुटांची दोन एकत्रित घरे बांधण्याला ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी संमती दिली असून, यासाठी १२.६० लाख रुपये खर्च येणार आहे. या कामांसाठी माळीण ग्रामस्थांचा लोकसहभाग घेतला जाणार असून, घरांची कामे डिसेंबरमध्ये सुरू करून मे २०१६ अखेर घरांचा लोकार्पण सोहळा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज सांगितले. घोडेगाव येथे पंचायत समिती सभागृहात माळीण पुनर्वसनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी माळीण ग्रामस्थ, लोकप्रतिनधी व अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी यांनी आयोजित केली होती. या बैठकीस विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, जिल्हा टाउन प्लॅनर जितेंद्र भोपळेव मोठ्या संख्येने माळीण ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी वळसे पाटील म्हणाले, की दोन घरे एकत्र बांधण्याचा प्रस्ताव उत्तम आहे. १२.६० लाख रुपयांत ८६६.७३ चौरस फुटाच्या एकत्रित दोन घरांना लोकांनी मान्यता द्यावी. तसेच माळीण दुर्घटनेत ज्याला एक रुपयादेखील मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना लोकसहभागाची रक्कम भरण्याची आर्थिक झळ लागू देणार नाही याची व्यवस्था केली जाईल. मात्र ज्याला पैसे मिळाले आहेत त्यांनी लोकसहभाग द्यायला हरकत नाही.

Web Title: Malini's house will be set to end in May 2016

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.