मालदांडी ज्वारीची भाकरी करपली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:41 AM2018-12-19T00:41:32+5:302018-12-19T00:41:57+5:30

बारामती तालुका रब्बी हंगामात येतो. जिरायती भागात रब्बी व खरीप दोन्ही हंगाम महत्त्वाचे मानले जातात.

Malodandi jowar bati karpali ... | मालदांडी ज्वारीची भाकरी करपली...

मालदांडी ज्वारीची भाकरी करपली...

Next

रविकिरण सासवडे

बारामती : भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे प्रसिद्ध मालदांडी ज्वारीची भाकरी करपली आहे. बारामतीच्या जिरायती भागात मालदांडी ज्वारीचे पीक रब्बी हंगामात मोठ्याप्रमाणात घेतले जाते. गावरान, पारंपरिक पीक असल्याने मालदांडीची चव जिभेवर रेंगाळते; मात्र ज्वारीची यंदा अल्प पेरणी झाली. झालेल्या पेरण्यासुद्धा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत.

बारामती तालुका रब्बी हंगामात येतो. जिरायती भागात रब्बी व खरीप दोन्ही हंगाम महत्त्वाचे मानले जातात. पावसाने खरीप हंगामात चांगली साथ दिल्यास जिरायती भागात हमखास रब्बी हंगामात मालदांडी ज्वारीचे पीक घेतले जाते. येथील लोणीभापकर, मोरगाव, सुपे, उंडवडी कडेपठार मंडळामध्ये मालदांडी ज्वारीचे पीक मोठ्याप्रमाणात घेतले जाते. येथील शेतकऱ्यांनी मालदांडी ज्वारीचे बियाणे परंपरेने सांभाळून ठेवले आहे. टपोरे दाणे, कसदार कडबा व चवदार भाकरी यामुळे मालदांडी ज्वारीला मोठ्याप्रमाणात मागणी असते. जनावरांना उत्तम चारा देणारे हे पीक आहे. जिरायती भागातील बहुतांश दुग्धव्यवसाय मालदांडीच्या कडब्यावर अवलंबून असतो. ज्या शेतकºयांकडे जनावरांची संख्या जास्ता आहे, असे शेतकरी हमखास मालदांडी ज्वारीचे पीक मोठ्याप्रमाणात घेतात. परिणामी, बारामतीचा जिरायती भाग ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, मागील पाच वर्षांपासून हा भाग दुष्काळाशी दोन हात करीत आहे. ज्वारी हे इथले प्रमुख पीक आहे. केवळ पावसाच्या भरवशावर ते घेतले जाते. बारामती तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान सुमारे ४५० मिमी आहे. सरासरीएवढा पाऊस जिरायती भागात झाल्यास कºहा नदीच्या खोºयातील काळ्या कसदार जमिनीमध्ये पावसाच्या ओलीवर मालदांडी बहरते. शहरी भागात बारामतीच्या जिरायती भागातील मालदांडी ज्वारीचा हुर्डा प्रसिद्ध आहे. या भागातील शेतकºयांना हुर्डापार्ट्यांच्या निमित्ताने हमखास अतिरिक्त उत्पादनाचे साधन उपलब्ध होते. यंदा मालदांडी ज्वारी नसल्याने ग्रामीणभागासह शहरी नागरिक देखील हुर्ड्याला मुकणार आहेत.

दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा उत्पादन नाही
1बारामती तालुक्यातील रब्बीच्या सरासरी ९९ हजार ९०० हेक्टर क्षेत्रापैकी ४४ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून केवळ ११ हजार ७३५ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली. मात्र, या पेरण्यासुद्धा पाण्याअभावी जळून गेल्या आहेत.

2मालदांडीचा उपयोग दुभत्या गाईंसाठी चारा म्हणूनही केला जातो. मालदांडीमध्ये जनावरांसाठी आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात आहेत. दाणा टपोरा असून, त्याची व चाºयाची प्रत उत्तम असते. मात्र, यंदा मालदांडीचा कडबा दुरापास्त झाला आहे.
3जिरायती भागातील पशुपालकांना साखर कारखाना कार्यक्षेत्रातून ४ हजार ते ४ हजार ५०० रुपये टनाने उसा सारखा निकृष्ट चारा आणावा लागत आहे. परिणामी, जनावरांची दुग्धउत्पादन क्षमता घटून आर्थिक नुकसानदेखील सोसावे लागत आहे.

Web Title: Malodandi jowar bati karpali ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे