माळशिरसचे काेविड सेंटर कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:17+5:302021-05-13T04:10:17+5:30
सरपंच महादेव बोरावके यांनी बैठक घेऊन विलगीकरण कक्ष सुरू केला. कै. तानाजी आप्पा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष अरुण यादव यांनी ...
सरपंच महादेव बोरावके यांनी बैठक घेऊन विलगीकरण कक्ष सुरू केला. कै. तानाजी आप्पा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष अरुण यादव यांनी साधू वासवाणी मिशनचे पुरंदर तालुका समन्वयक महेश राऊत यांच्याकडे माळशिरस येथील भुलेश्वर कोविड सेंटरला मदत करण्याची मागणी केली. त्यानुसार साधू वासवाणी मिशनच्या पदाधिकाऱ्यांनी माळशिरस येथील सूर्या लाॅन्स येथील पहाणी केली होती. त्यानुसार पूर्व भागातील लोकांसाठी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी मदत केली.
या वेळी पुरंदरचे आमदार संजय जगताप, जिल्हा बॅंकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडे, तहसीलदार रूपाली सरनोबत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, पंचायत समिती सदस्या सोनाली यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव, माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक अबनावे, साधू वासवाणी मिशनचे प्रकाश वासवाणी, साधू वासवाणी मिशनचे पुरंदर तालुका मदतनीस महेश राऊत, सूर्या लाॅन्सचे प्रमुख हमीद सय्यद आदी उपस्थित होते.