राखी व्यवसायात मामेभावानेच केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:07 AM2021-05-03T04:07:34+5:302021-05-03T04:07:34+5:30
दीपक ओमप्रकाश दायमा (वय २४) आणि सुमन दीपक दायमा (वय ३९, रा. रविवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे ...
दीपक ओमप्रकाश दायमा (वय २४) आणि सुमन दीपक दायमा (वय ३९, रा. रविवार पेठ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आनंद शामसुंदर दायमा (वय ३४, रा़ रविवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी दिपक हा फिर्यादी यांचा मामे भाऊ आहे. फिर्यादीने आरोपीकडून व्यवसायासाठी ८ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी १ लाख ८० हजार परत केले होते. उर्वरीत रकमेच्या बदल्यात दीपक आणि सुमन याच्या मागणीवरून त्यांनी २२ ते २४ सप्टेंबर २०१९ दरम्यान ९ लाख रुपये किंमतीचे तयार राखीचे ४५ बॉक्स व ११ लाख २० हजार रुपये किंमतीचे तयार राखीचे ५६ बॉक्स असे एकूण २० लाख २० हजार रुपयांचा किंमतीचा तयार माल विकण्यासाठी दिला होता. तो माल विकून उर्वरीत १४ लाख रुपये दोघांनी परत करणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी ते न दिल्याने व फिर्यादीने दिलेल्या कोर्या धनादेशाचा गैरवापर केल्याने याबाबत फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.