विदेशी मद्यसाठा गुजरात येथे विक्रीसाठी नेणाऱ्या एकाला कामशेतजवळ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 12:47 PM2021-02-02T12:47:59+5:302021-02-02T12:48:44+5:30

२४ हजार ५०८ रूपये किमतीचा अवैध विदेशी दारूचा साठा जप्त

Man arrested near kamshet who going fto gujrat for selling foreign liquor | विदेशी मद्यसाठा गुजरात येथे विक्रीसाठी नेणाऱ्या एकाला कामशेतजवळ अटक

विदेशी मद्यसाठा गुजरात येथे विक्रीसाठी नेणाऱ्या एकाला कामशेतजवळ अटक

Next

लोणी काळभोर : पुणे येथील मिलिटरी कॅन्टीनमधील विदेशी मद्यसाठा गुजरात येथे विकण्यासाठी नेणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने जेरबंद केले आहे. 

याप्रकरणी मयुर सतिश उघाडे ( रा. लोणी काळभोर ता. हवेली ) याला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेेल्या माहितीनुसार सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, प्रकाश वाघमारे, सुनील जावळे, महेश गायकवाड, निलेश कदम, गुरू गायकवाड, सुभाष राऊत, अक्षय नवले, प्रसन्न घाडगे यांनी केली आहे.

सोमवारी ( दि.१ ) पथक कामशेत परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय खबऱ्या मार्फत मयुर उघाडे हा पुणे - अहमदाबाद भाग्यलक्ष्मी ट्रॅव्हल्स लक्झरी (क्रमांक जीजे ०३ बीटी २२५७) बसमधून त्याच्याकडील बॅगांमध्ये अवैध विदेशी दारुसाठा विक्रीसाठी गुजरात येथे घेवून जाणार आहे. अशी माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने कामशेत ( ता.मावळ ) येथील एक्सप्रेस महामार्गावर बोगद्याचे नजीक सदर नंबरची ट्रॅव्हल्स लक्झरी बस आडवून तपासणी केली असता मयुर उघाडे याच्याकडे २४ हजार ५०८ रूपये किमतीचा अवैध विदेशी दारूचा साठा मिळून आला.  तो जप्त केला आहे. चौकशीत सदर दारू ही मिलिटरी कॅन्टीन मधून घेतली असल्याचे आढळून आलेले आहे. आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कामशेत पोलीस ठाण्याचे ताब्यात दिला असून पुढील तपास कामशेत पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी हे करीत आहेत. 

Web Title: Man arrested near kamshet who going fto gujrat for selling foreign liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.