नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:14 AM2021-01-19T04:14:04+5:302021-01-19T04:14:04+5:30
पुणे : नायलॉन मांजा लोकांसाठी प्राणघातक ठरत असल्याने शहरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असतानाही त्याची विक्री करणार्या एका ...
पुणे : नायलॉन मांजा लोकांसाठी प्राणघातक ठरत असल्याने शहरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असतानाही त्याची विक्री करणार्या एका दुकानदाराला गुन्हे शाखेच्या युनिट १च्या पथकाने अटक केली आहे.
अन्वर उमर शेख (वय ३९, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्वर हा घरातूनच कटलरी साहित्याची विक्री करण्याबरोबरच मांजाची विक्री करीत होता. त्याकडून ३२ हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जात असल्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी नायलॉन मांजा विक्री करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेची पाचही युनिट तसेच पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत होते. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी हे त्यांच्या पथकासह खडक पोलीस ठाण्याच्या परिसरात गस्त घालत असताना इम्रान शेख व अमोल पवार यांना अन्वर शेख हा कासेवाडी येथे नायलॉन मांजा विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अन्वर याच्या घरावर छापा घालून नायलॉन मांजाचा साठा हस्तगत केला आहे. अन्वर हा कटलरी विस्तू विक्री करण्याचा व्यावसाय करतो.