Pune: मारहाण करुन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; पुणे शहरातील घटना

By विवेक भुसे | Published: June 15, 2023 03:49 PM2023-06-15T15:49:00+5:302023-06-15T15:49:48+5:30

त्यानंतर त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रकार समोर...

Man beaten to death by stone on head; Incident in Pune city latest crime news | Pune: मारहाण करुन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; पुणे शहरातील घटना

Pune: मारहाण करुन तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; पुणे शहरातील घटना

googlenewsNext

पुणे : तरुणाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रकार समोर आला आहे. मालधक्का चौकाच्या स्टेशन रोडच्या रेल्वे कॉर्टरलगत हा प्रकार घडला असून बुधवारी सकाळी तो उघडकीस आला. याबाबत पोलीस शिपाई ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे सरकारी कॉर्टसच्या जवळील पडक्या घराच्या मागे एका ३० ते ३५ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी पाहणी केली असता त्या मृतदेहाच्या अंगावर मुंग्या लागल्या होत्या. त्याच्या अंगामध्ये विटकरी रंगाचा शर्ट, लाल रंगाचे बनियन, ट्रॅक पॅट होती. त्यांच्या हनुवटीजवळ मोठी जखम होती. डोक्यात दगड घालून त्याचा खून केला होता. तसेच ओळख पटू नये, म्हणून तोच दगड चेहऱ्यावर मारून चेहरा विद्रुप केला होता. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून सहायक पोलीस निरीक्षक संदीप मधाळे तपास करीत आहेत.

Web Title: Man beaten to death by stone on head; Incident in Pune city latest crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.