सिंगापूर तिकिटाच्या बहाण्याने तरुणाला चुना : भामट्याला पोलिसांनी केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 08:19 PM2019-02-25T20:19:32+5:302019-02-25T20:24:07+5:30
सिंगापूरच्या विमानाचे तिकीट आरक्षित करून देतो सांगून ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मिकी सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत अशोक सदाफळ (रा. पर्वती ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पुणे : सिंगापूरच्या विमानाचे तिकीट आरक्षित करून देतो सांगून ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. मिकी सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संकेत अशोक सदाफळ (रा. पर्वती ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
संकेत महाविद्यालयात हॉटेल मॅनजमेंटचे शिक्षण घेतो. त्याने जस्ट डायलला फोन करुन मॉरिशिअस टुर्ससाठी चौकशी केली होती. त्यानंतर संकेतला मिकीचा फोन आला. त्याने संकेतला मॉरिशिअसचे तिकीट बुक झाल्याचे सांगून ई-मेल पाठविला. त्यामुळे तिकीट बुविंâगाची खात्री झाल्याने संकेतने मिकीच्या सांगण्यानुसार ऑनलाईन ९९ हजार रुपये जमा केले. त्यानंतर मिकीने रक्कम जमा होताचा संकेतचे ऑनलाइन आरक्षित केलेले तिकीट रद्द केले. त्यामुळे संकेतने मिकीस फोन केला असता तो बंद लागला. त्यानुसार संकेतने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सायबर विभागाने माग काढून मिकी सिंग याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने संकेतची फसवणूक केल्याचे कबूल केले. तसेच मिकीने राहण्यासाठी एक फ्लॅट घेतला होता. त्या घरमालकास त्याने भाडे दिले नसल्याची माहिती उघड झाली आहे. तर एका फ्लॅटमधील फर्निचर चोरल्याचेही निष्पन्न झाले आहे.