Pune Crime: दारूच्या पैशांसाठी तळीरामाने केला पत्नीचाच खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 01:41 PM2021-09-22T13:41:28+5:302021-09-22T13:53:21+5:30

जयश्री आणि किशोर यांचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. किशोरला दारूसह इतर अन्य व्यसनेही होती

man killed his wife money liquor yerawada crime news | Pune Crime: दारूच्या पैशांसाठी तळीरामाने केला पत्नीचाच खून

Pune Crime: दारूच्या पैशांसाठी तळीरामाने केला पत्नीचाच खून

Next
ठळक मुद्देजयश्री आणि किशोर यांचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होताजयश्रीचा मृत्यू झाल्याची समजतात किशोरने ससून रुग्णालयातून पळ काढला होता

पुणे: पत्नीला बेदम मारहाण करत पाठीत चाकू खुपसून पतीने निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना येरवड्यात मंगळवारी रात्री घडली. या दुर्दैवी घटनेत जयश्री किशोर शिरसाठ (वय 30,रा. लक्ष्मीनगर,येरवडा) तिचा खून झाला आहे. या प्रकरणी पती किशोर आत्माराम शिरसाट(वय 39) याला येरवडा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. जयश्री हिचा भाऊ रोहित उत्तम वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती किशोर शिरसाठ विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 जयश्री आणि किशोर यांचा दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. किशोरला दारूसह इतर अन्य व्यसने होती. तो कोणताही कामधंदा करत नव्हता. जयश्री मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत असे. व्यसनासाठी तो वारंवार पैशाची मागणी करत जयश्रीला बेदम मारहाण करत होता. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे झालेल्या भांडणात किशोर याने जयश्रीला बेदम मारहाण केली. यावेळी त्याच्या घरातील कुटुंबीय देखील हजर होते. या मारहाणीत त्याने तिच्या पाठीत चाकूने भोसकून तिचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जयश्रीला तो व त्याची आई रिक्षामधून ससून रुग्णालयात घेऊन गेले. मात्र या गंभीर मारहाणीत मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा ससून रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.

जयश्रीचा मृत्यू झाल्याची समजतात त्याने ससून रुग्णालयातून पळ काढला. दरम्यान या गंभीर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, गुन्हे निरीक्षक विजयसिंह चौहान यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कर्पे व महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे त्यांचे दोन पथके नेमून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान विशाल याने ससून रुग्णालयातून घरी जाऊन घरातील रक्ताचे डाग पुसून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यानंतर त्याच्या घरातील इतर लोक व तो स्वतः देखील तेथून फरार झाले. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. या याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपी किशोर विरुद्ध पत्नीच्या निर्घुण खूनप्रकरणी तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे विजयसिंह चौहान करीत आहेत. 

Web Title: man killed his wife money liquor yerawada crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.