उधार सिगारेट देण्यास नकार देणाऱ्या टपरीचालकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2019 09:36 AM2019-09-02T09:36:52+5:302019-09-02T09:42:36+5:30
उधार सिगारेट देण्यास नकार दिल्याने तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन एका टपरीचालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे - उधार सिगारेट देण्यास नकार दिल्याने तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन एका टपरीचालकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. संतोष कदम (32) असे टपरी चालकाचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी बाणेर येथे घडली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथे संतोष कदम यांची पानटपरी आहे. रविवारी सायंकाळी त्याच्याकडे तीन जण आले. त्यांनी कदम यांच्याकडे सिगारेट मागितली. तेव्हा त्यांनी पैसे मागितल्यावर त्यांच्यात वाद झाला. तेव्हा तिघांनी कोयता, गुप्तीने संतोष कदम याच्यावर एका पाठोपाठ एक वार केले. यात जबर जखमी झालेल्या संतोष याला लोकांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रात्री उशिरा याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांची नावे पोलिसांना मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे.