मुलाला जीवे मारण्याची धमकी देत नराधमाचा महिलेला झुडपात ओढून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 06:23 PM2022-06-07T18:23:11+5:302022-06-07T18:24:19+5:30

आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

man rapes woman after threatening to kill her child baramati crime news | मुलाला जीवे मारण्याची धमकी देत नराधमाचा महिलेला झुडपात ओढून बलात्कार

मुलाला जीवे मारण्याची धमकी देत नराधमाचा महिलेला झुडपात ओढून बलात्कार

Next

बारामती (पुणे): मुलाला जीवे मारण्याची धमकी देत बारामतीत भर दिवसा एका महिलेला काटेरी झुडपात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रोहित केशव जगताप (वय २८, रा. कसबा, बारामती) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (दि. ६) दुपारी १२ वाजता आरोपीने पिडीतेला तिच्या मुलास जीवे मारण्याची धमकी देत मोरगाव रस्ता सिकंदरनगर येथील झुडपात ओढत नेले. आता येथे कोणी नाही, मी तुला पाहिजे तसे वापरणार असे अश्लील बोलून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. तेवढ्यावर न थांबता आरोपीने पिडीत महिला ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी गोंधळ केला आणि सोबत चल, अशी परत मागणी केली. तिने नकार दिला असता तिच्या घरी जाऊन तिच्या दरवाज्याची तोडफोड केली. तसेच पिडीतेच्या घराचे कुलुप तोडुन नुकसान केले.

पोलिसांनी महिलेचा जबाब तत्काळ नोंदवून आरोपीला ताबडतोब अटक केली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक युवराज घोडके, तसेच पोलीस हवालदार शिंदे, इंगळे हे करीत आहेत. आरोपीला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक महाडिक यांनी दिली.

Web Title: man rapes woman after threatening to kill her child baramati crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.