सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 09:19 PM2019-09-09T21:19:31+5:302019-09-09T21:21:34+5:30
सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून नात्याला काळीमा फासणाऱ्या भावाला विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली आहे.
पुणे : सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून नात्याला काळीमा फासणाऱ्या भावाला विशेष न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांनी १० वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल असे ही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.
याप्रकरणी न्यायालयाने १९ वर्षीय भावाला शिक्षा सुनाविली आहे. याबाबत त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. फियार्दी आणि त्यांचे पती हे मजुरीचे काम करतात. पिडीत मुलगी व तिचा भाऊ हे दोघे शाळेमध्ये होते. घरी असताना आरोपीने पिडीत मुलीला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यातून पिडीत मुलगी गरोदर राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने फियार्दींनी तिच्याकडे विचारणा केली असता तिने काही सांगितले नाही. त्यानंतर तिला दवाखान्यात नेल्यानंतर ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर तिला एका सामाजिक संस्थेमध्ये समुपदेशनाकरिता पाठविले असता तिने भावानेच आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितले, असे फियार्दीत नमूद केले आहे. सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी पाच साक्षीदार तपासले. पिडीत मुलीने बाळाला जन्म दिला असून, आरोपी व त्या बाळाचा डीएनए अहवालामध्ये आरोपी हाच त्या बाळाचा बाप असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपीने केलेला गुन्हा हा गंभीर आहे. त्यामुळे समाजात चांगला संदेश जाण्यासाठी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. मोरे यांनी युक्तीवादा दरम्यान केली. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणने एकूण घेऊन एवूष्ठन घेत आरोपीला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनाविली.