Lonavala | लोणावळा रेल्वे स्टेशनबाहेर सिमेंट ब्लाॅकने मारहाण करत एकाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 12:26 PM2023-04-13T12:26:54+5:302023-04-13T12:27:51+5:30

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

man was beaten to death with a cement block outside the Lonavala railway station | Lonavala | लोणावळा रेल्वे स्टेशनबाहेर सिमेंट ब्लाॅकने मारहाण करत एकाचा खून

Lonavala | लोणावळा रेल्वे स्टेशनबाहेर सिमेंट ब्लाॅकने मारहाण करत एकाचा खून

googlenewsNext

लोणावळा : लोणावळ्यात रेल्वे स्टेशनच्या बाहेर विश्रामगृहाच्या बांधकामासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लाॅकने मारहाण करत एका इसमाचा खून करण्यात आला असल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा रेल्वे स्टेशनचे जवळ बंगलो नं. एफ १२४ समोर रेल्वे स्टेशनबाहेरील विश्रामगृहाच्या कंपाउंडच्या बांधकामासाठी फूटपाथवर ठेवलेल्या सिमेंट ब्लॉकपैकी एका सिमेंट ब्लॉकने मारहाण करून या अनोळखी व्यक्तीचा खून करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४५ ते ५० आहे. याप्रकरणी सेंट्रल रेल्वे मंडल स्टेशन मॅनेजर भगवानसरान किशोरीशरण राजपूत (वय ५७) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून लोणावळा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पो. नि. सीताराम डुबल हे करीत आहेत.

Web Title: man was beaten to death with a cement block outside the Lonavala railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.