मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट, तब्बल 42 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:09 AM2021-04-12T04:09:34+5:302021-04-12T04:09:34+5:30
आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. विशेषता मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांत दररोज ...
आंबेगाव तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे. विशेषता मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांत दररोज दीडशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी 141, शुक्रवारी 154, तर शनिवारी 155 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. मंचर शहरात शनिवारी तब्बल 42 रूग्ण आढळून आले आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्नामुळे चिंता वाढली आहे. सरकारी तसेच खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत. ॲक्टिव रुग्णसंख्या एक हजाराच्या पुढे गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. शिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असून रुग्णांच्या नातेवाईकांना ती मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शनिवारी व रविवारी कडक लॉकडाउन पाळण्यात आला. वैद्यकीय सेवा वगळता सर्व काही ठप्प होते. ब्रेक दि चेन या शासनाच्या धोरणानुसार नागरिकांनी उत्स्फूर्तपणे लॉकडावून मध्ये सहभाग घेतला. मंचर शहरात दोन दिवस शुकशुकाट होता.
शनिवारी-रविवारी लॉकडाऊन असल्याने मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुकशुकाट होता.