मंचर पोलिसांनी लोणी येथे केला तीन ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:17 AM2021-02-21T04:17:14+5:302021-02-21T04:17:14+5:30
याबाबत पोलीस जवान सोमनाथ गवारी यांनी फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यात मागील महिन्यात वडगाव काशिंबेग ...
याबाबत पोलीस जवान सोमनाथ गवारी यांनी फिर्याद दिली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यात मागील महिन्यात वडगाव काशिंबेग याठिकाणी वाळूउपसा करणा-या वाळूमाफियावर मंचर पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे अवैध वाळूउपसा बंद होता. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार लोणी-पाबळ रस्त्यावर जिल्हा परिषद शाळेसमोरून वाळूूने भरलेले वाहन जाणार आहे, अशी माहिती मिळाली. गस्तीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले यांना तातडीने घटनास्थळी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पहाटे साडेपाचच्या सुमारास खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाचे वाहन आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मोहम्मद जमादार मुजावर (रा. निमगाव दुडे, ता. शिरूर) असे नाव सांगितले व सदर वाहनात तीन ब्रास वाळू असल्याचे सांगितले. शिवाय शासनाची कोणतीही रॉयल्टी भरल्याची पावती नसल्याचे सांगन टिपर वाहनाचे (एम.एच.१६ ए. वाय.६८१६) मालक प्रवीण पंढरीनाथ वराळ (रा. निघोज, ता. पारनेर) यांच्या सांगण्यावरून वाहतूक करत असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरिक्षक सागर खबाले यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा टीपरसह तीन ब्रास वाळू किंमत २१ हजार रुपये व पाच लाख रुपये किमतीचा टीपर अशा प्रकारे एकूण पाच लाख २१ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.