नारायण राणे यांचा निषेध करत मंचरल आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:14 AM2021-08-25T04:14:27+5:302021-08-25T04:14:27+5:30
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेबद्दल विधान केल्याच्या निषेधार्थ आज आंबेगाव ...
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेबद्दल विधान केल्याच्या निषेधार्थ आज आंबेगाव तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रतीकात्मक पुतळा दहन करून आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख आहेत आणि त्यांचेवर टीका करणे संविधानिक नाही. नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे जनमानसांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र हे कायदा व सुव्यव्यस्थेचे पालन करणारे राज्य असल्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांचेवर तत्काळ मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. आंदोलकांचे निवेदन मंचर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थाटे यांनी स्वीकारले.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, युवासेना राज्य विस्तारक सचिन बांगर, जिल्हा परिषद गटनेते देविदास दरेकर, पंचायत समिती सदस्य प्रा. राजाराम बाणखेले, रवींद्र करंजखेले, युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रवीण थोरात पाटील, शिवसेना महिला आघाडी तालुका संघटक मालती थोरात, संगीता बाणखेले, सविता क्षीरसागर, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक सागर काजळे, माजी सरपंच दत्ता गांजाळे, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया राजगुरव, रंजना शेटे, राजाभाऊ काळे, घोडेगाव शहरप्रमुख तुकाराम काळे, मंचर शहरप्रमुख संदीप जुन्नरे, उपतालुकाप्रमुख संतोष डोके, अशोक थोरात, सुरेश घुले, वैभव पोखरकर, काळूराम लोखंडे, रोहन कानडे, सुनील गवारी, स्वप्निल हिंगे, राहुल पडवळ, अजित आवटे, सदानंद कोल्हे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.