मंचरचा आठवडे बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:09 AM2021-03-28T04:09:41+5:302021-03-28T04:09:41+5:30

मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. विशेषता सद्यस्थितीत मंचर शहर ...

Manchar's weekly market closed | मंचरचा आठवडे बाजार बंद

मंचरचा आठवडे बाजार बंद

Next

मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांची वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. विशेषता सद्यस्थितीत मंचर शहर व आजूबाजूच्या परिसरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याकरिता जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार मंचर शहरातील कोरोनाप्रादुर्भाव रोखण्यासाठी व रुग्णांचा वाढता आलेख नियंत्रित करण्यासाठी मंचर शहराचा रविवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिक आठवडे बाजारात बसणारे शेतकरी, व्यापारी यांनी नोंद घ्यावी व ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले व सदस्यांनी केले आहे. मंचर शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करावे,असे आवाहन ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने यांनी केले आहे.

Web Title: Manchar's weekly market closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.