मंडई व्यावसायिक करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:34+5:302021-02-07T04:10:34+5:30
पुणे : भाजीपाला, फळे, पान, पूजा साहित्य आणि भुसारी विक्रेत्यांना पुणे महानगरपालिका आणि मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात ...
पुणे : भाजीपाला, फळे, पान, पूजा साहित्य आणि भुसारी विक्रेत्यांना पुणे महानगरपालिका आणि मेट्रो यांच्याकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत याच्या निषेधार्थ मंडईतील व्यावसायिक आणि वंचित बहुजन आघाडी येत्या ११ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार आहेत.
मंडई विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काची यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ‘वंचित’चे नितीन शेलार, भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कासुर्डे, राहुल खोपडे, संतोष कुदळे, कमलेश काची, राजू शहाणे आदी यावेळी उपस्थित होते.
सोमनाथ काची म्हणाले की, सर्व व्यापारी मेट्रोसाठी जागा द्यायला तयार आहेत. पण मेट्रोच्या आराखड्यानुसार कार्यवाही होणे गरजेचे आहे. त्याआधी स्थानिक व्यावसायिकांचे पुनर्वसन व्हावे. भाडेवाढ रद्द करणे, गाळे दुरुस्ती, करारनामा रद्द करणे या मागण्यांवरही विचार झाला पाहिजे.
..................