मंडप व्यावसायिक अडचणीत, शासनाकडून मदतीची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:37+5:302021-04-06T04:10:37+5:30
भोर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे व कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांनी मांडव घालून कार्यक्रम घेण्याचे टाळले आहे. उपासमारीची वेळ मंडप ...
भोर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे व कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांनी मांडव घालून कार्यक्रम घेण्याचे टाळले आहे.
उपासमारीची वेळ मंडप व्यावसायिकांवर आली आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे लग्नसमारंभांवर बंदी घातली आहे. या मुळे मंडप डेकोरेशन चालकांचे आर्थिक नुकसान मोठे झाले आहे.
लॉकडाऊनमध्ये व कडक निर्बंधांमुळे सर्व समारंभ कार्यक्रम, लग्नसमारंभ, यात्रा, उरूस आदी कार्यक्रम बंद असल्याने मंडप डेकोरेशन बँडपार्टी, मंगल कार्यालय आदी व्यवसाय ठप्प झाले आहेत.
अनेक मंडप व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी कर्ज काढून मंडप व्यवसाय वाढविला आहे त्यांचे बँकेचे हप्ते जात नाहीत. त्यांच्यासाठी खास शासनाच्या माध्यमातून मदत मिळावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
भोर तालुक्यातील मंडप व्यावसायिक हे हालाखीचे जीवन जगत आहेत. गेले वर्षभरापासून कोणत्याही व्यावसायिकांच्या हाताला काम नाही. त्यांचे साहित्य धूळखात पडून आहे. शासनाकडून काहीतरी मदत मिळावी त्यामुळे आम्हा व्यवसायिकांना कुठेतरी आधार मिळेल असे मत ग्रामीण भागातील मंडप व्यवसायिक दिनकर गोळे, दगडु (बाबू ) कुमकर यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.