देलवडीच्या उपसरपंचपदी मंगल शेलार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:10 AM2021-01-17T04:10:42+5:302021-01-17T04:10:42+5:30
अर्जुन वाघोले यांनी इतरांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. निवडणुकीत निर्धारित वेळेत शेलार ...
अर्जुन वाघोले यांनी इतरांना संधी मिळावी म्हणून उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. निवडणुकीत निर्धारित वेळेत शेलार यांचे विरोधात एकही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक लोणकर यांनी शेलार यांना विरोध जाहीर केले. या वेळी सरपंच नीलम काटे, भीमा-पाटसचे संचालक विकास शेलार, बंडू शेलार,बाळासाहेब वाघोले, नरेंद्र काटे, लक्ष्मण शेलार, वसंत वाघोले,बबन शेलार, बंडू वांझरे, सुभाष शेलार, विलास शेलार, महादेव शेलार, राजेंद्र कोंडे, चांगदेव आडागळे,काका शेलार व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. आगामी काळामध्ये देलवडी गावच्या विकासासाठी सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच मंगल शेलार यांनी केले.
१६ केडगाव निवड
देलवडी येथे नवनिर्वाचित उपसरपंच मंगल शेलार यांचा सत्कार करताना सरपंच नीलम काटे.