मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार जाहीर
By श्रीकिशन काळे | Published: June 18, 2024 10:50 AM2024-06-18T10:50:33+5:302024-06-18T10:51:17+5:30
पुणे : ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर ...
पुणे : ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. या वर्षीचा उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा कै. रा. द. पुसाळकर पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना आणि उत्कृष्ट रहस्य कथा लेखनासाठीचा कै. इंदुमती पुसाळकर पुरस्कार लेखिका रमा गोळवलकर यांना जाहीर झाला आहे.
रोख रक्कम आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार, दि. २५ जून २०२४ रोजी सायं. ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.