मंगलमूर्ती मोरया! श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:10 AM2022-05-03T10:10:48+5:302022-05-03T12:19:02+5:30
आंबे ऊद्या ससून मधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्ध आश्रम , दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार
पुणे : अक्षयतृतीये निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे.
हे आंबे ऊद्या ससून मधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्ध आश्रम , दिव्यांग आणि भाविंकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेकांचे मोबाईल सरसावले होते.
आंबा महोत्सव निमित्त मंदिरामध्ये पहाटे 4 ते 6 प्रसिद्ध गायिका आशा ताई खाडिलकर यांचा स्वराभिषेक हा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 ते 12 गणेश याग त्यांनतर दुपारी 12.36 ला भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शारदेश मंगलम विवाह सोहळा आणि रात्री 9 वाजता अखिल भारतीय महिला मंडळाच्या वतीने भजन आयोजित करण्यात आले आहे.