खरेदीच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:12 AM2021-02-15T04:12:21+5:302021-02-15T04:12:21+5:30

पुणे : खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी ६ लाखांचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी सराफ व्यावसायिक रोहित ...

Mangalsutra lampas under the pretext of purchase | खरेदीच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

खरेदीच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

Next

पुणे : खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी ६ लाखांचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली.

याप्रकरणी सराफ व्यावसायिक रोहित बाबर (वय २९, रा. रविवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाबर यांची रविवार पेठेतील गोविंद हलवाई चौकात लक्ष्मी गोल्ड ओर्नामेंट या नावाचे दुकान आहे. शुक्रवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास चोरटा खरेदीच्या बहाण्याने दुकानात आला. त्या वेळी बाबर यांचे भाऊजी दुकानात होते. चोरट्याने त्यांना मंगळसूत्र दाखविण्यास सांगितले. त्यांना बोलण्यात गुंतवले आणि नकळत ६ लाखांचे मंगळसूत्र लांबविले. चोरटा खरेदी न करता दुकानातून बाहेर पडला. काही वेळानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.

---

Web Title: Mangalsutra lampas under the pretext of purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.