मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:10 AM2021-04-03T04:10:39+5:302021-04-03T04:10:39+5:30

पुणे : वटपौर्णिमेच्या दिवशी रस्त्याने पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एकास न्यायालयाने एक वर्षे आठ महिने ...

Mangalsutra snatcher hard labor | मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास सक्तमजुरी

मंगळसूत्र हिसकावणाऱ्यास सक्तमजुरी

Next

पुणे : वटपौर्णिमेच्या दिवशी रस्त्याने पायी जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एकास न्यायालयाने एक वर्षे आठ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. २०१८ साली पाषाण व बाणेर परिसरात घडलेल्या सोनसाखळीचोरीच्या दोन गुन्ह्यांत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. राणे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

मोहसिन अब्बास शेख (वय ३०, दोघेही रा. गंज पेठ) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. २७ जून २०१८ रोजी पाषाण परिसरातील साई चौकात सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या दिवशी वटपौर्णिमा असल्याने फिर्यादी या पूजेसाठी विड्याचे पान आणण्यासाठी निघाल्या होत्या. या वेळी आरोपींनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून लंपास केले. तर, दुसरी घटना याच दिवशी बाणेर परिसरात घडली. या प्रकरणी आरोपींना अटक करत त्यांविरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील विशाल मुरळीकर यांनी कामकाज पाहिले. याप्रकरणात त्यांनी पाच साक्षीदार तपासले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नाईक रमाकांत बारामतीकर यांनी सहकार्य केले.

Web Title: Mangalsutra snatcher hard labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.