वेध विलिनीकरणाचे मांगडेवाडी १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:35+5:302021-03-19T04:10:35+5:30

........................................ कात्रज विहिरीतील स्रोत आटल्याने हाल, महापालिकेकडून अपेक्षा ....................................... दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घनदाट लोकवस्ती असलेल्या ...

Mangdewadi of Vedha Merger 1 | वेध विलिनीकरणाचे मांगडेवाडी १

वेध विलिनीकरणाचे मांगडेवाडी १

Next

........................................

कात्रज विहिरीतील स्रोत आटल्याने हाल, महापालिकेकडून अपेक्षा

.......................................

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : घनदाट लोकवस्ती असलेल्या कात्रजला खेटून असलेले मांगडेवाडी निसर्गरम्य परिसराने व्यापलेले गाव आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच पाणीपुरवठा, रस्ते, अतिक्रमण, कचरा आदी समस्यांनी गावाला घेरले आहे.

कचरा निर्मूलनासाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा आहे, परंतु गावात चोहीकडे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. गावातील कचरा खासगी जागेवर एकत्र करून जाळला जात असल्याचे गावकरी सांगतात. आता महापालिकेत जर गाव विलीन होणार असेल, तर आम्हाला कचरा डेपो व कचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .

गावात अंतर्गत रस्त्यांची काही कामे उत्तम झाली, मात्र काही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गावातील मध्यभागी असलेला एक रस्ता अंतर्गत वादामुळे रखडलेला आहे. या रस्त्यावर सगळीकडे माती आणि खडी पडलेली आहे. वाहने या रस्त्यावर घसरतात तर चालताना महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो आहे.

जवळपास गावात सगळ्या भागात भूमिगत गटार योजना होऊनही सांडपाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. गावाबाहेरील ओढ्याला महापूर आला तेव्हा गावातील अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन वाहून गेली. सध्याची ड्रेनेजव्यवस्था अपुरी असून जी आहे ती ठिकठिकाणी फुटलेली आहे, परिणामी त्यातून दुर्गंधी येते.

गावात मुख्यतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गावाबाहेरील कात्रज तलावाजवळील एका विहिरीच्या पाण्यावर गावकऱ्यांना अवलंबून राहावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी कात्रजला जाऊन पाणी आणावे लागते.

कोट

जागा नसल्याने कचऱ्याचा प्रश्न उद्भवला आहे. सध्या जे पाणी मिळते ते अपुरे असून महापालिकेतील समावेशानंतर पाणीप्रश्न सुटेल अशी आशा आहे.

-अर्चना मांगडे, सरपंच.

चौकट

गावात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. महापालिकेने हक्काचे रस्ते मोकळे करावेत.

-प्रकाश काशिद, नागरिक

......................................

फोटो ओळ

गावाच्या मध्यभागी असलेल्या या रस्त्यावर, वाहनचालक घसरतात, त्यामुळे अपघाताचा धोका आहे..

Web Title: Mangdewadi of Vedha Merger 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.