पुण्यातील मार्केट यार्डामध्ये आंबा दाखल, कर्नाटक हापूसच्या 2 डझनच्या 20 पेट्याची आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 05:32 PM2017-12-10T17:32:17+5:302017-12-10T17:33:54+5:30

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापा-यांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करुन स्वागत केले. यंदाच्या सिझन महिली ही पहिलीची आवक असून, गत वर्षीच्या तुलनेत तीन आठवडे अगोदरच आंबा बाजारात दाखल झाला आहे.

Mango liquor in Pune market yard, two dozen 20 beds in Karnataka Hapus | पुण्यातील मार्केट यार्डामध्ये आंबा दाखल, कर्नाटक हापूसच्या 2 डझनच्या 20 पेट्याची आवक

पुण्यातील मार्केट यार्डामध्ये आंबा दाखल, कर्नाटक हापूसच्या 2 डझनच्या 20 पेट्याची आवक

googlenewsNext

पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली. व्यापा-यांनी या कर्नाटक हापूसच्या पेटीचे पूजन करुन स्वागत केले. यंदाच्या सिझन महिली ही पहिलीची आवक असून, गत वर्षीच्या तुलनेत तीन आठवडे अगोदरच आंबा बाजारात दाखल झाला आहे.

याबाबत व्यापारी रावसाहेब कुंजीर यांनी सांगितले की, रविवारी कर्नाटक हापूसच्या २ डझन आंब्याच्या २० पेट्यांनी मार्केट यार्डमध्ये आवाक झाली आहे. या दोन डझनच्या पेटीस २५०० रुपये भावा मिळाला आहे. गत वर्षी ३ जानेवारी रोजी आंब्याची पहिली पेटी मार्केट मध्ये दाखल झाली होती. त्यावेळी चार डझनच्या पेटीस ३५०० रुपये भाव मिळाला होता. गतवर्षिच्या तुलनेत यंदा पहिल्या पेटीला चांगला भाव मिळाला आहे. 

यंदा राज्यात सर्वत्र चांगल्या पाऊस झाल्याने व आंब्यासाठी पोषक वातावरण असल्याने चांगल्या उत्पन्नाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. परंतु कर्नाटकसह  कोकण किनारपट्टील ओखी वादळाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याचा परिणाम आंब्याच्या हंगामावर होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे यंता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कर्नाटक हापूसची नियमित आवक सुरु होईल. तर रत्नागिरी हापूसची आवक सुरु होण्यासाठी २० ते २५ जनेवारी उजाडेल असा अंदाज व्यापारी अरविंद मोरे यांनी व्यक्त केला.

Web Title: Mango liquor in Pune market yard, two dozen 20 beds in Karnataka Hapus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.