तौक्तेमुळे आंबा गेला हातून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:12 AM2021-05-19T04:12:09+5:302021-05-19T04:12:09+5:30
दोन दिवस तौक्ते वादळामुळे मोठ्याप्रमाणात वारा सुटला होता. शिरूर तालुक्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी आंब्यांचे झाडे आहेत. सध्या आंबा पिक ...
दोन दिवस तौक्ते वादळामुळे मोठ्याप्रमाणात वारा सुटला होता. शिरूर तालुक्यामधील प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी आंब्यांचे झाडे आहेत. सध्या आंबा पिक काढणीला आले आहे. आंबा कैऱ्या योग्य वेळेस तोडाव्या लागतात. तोडणीला वेळ असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कैऱ्या तोडल्या नाहीत. शिरूर तालुक्यात लाखो आंब्यांचे झाडे आहेत. त्यांच्या कैऱ्या जोरांच्या वाऱ्यामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कैऱ्या खाली पडल्या आहेत तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या आहे. काही शेतकऱ्यांच्या बागा आहेत. त्या बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केले आहे.
आमदाबाद येथील महिला शेतकरी मनिषा दातात्रय जगताप म्हणाल्या की, वादळामुळे आमच्या पेरू व आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे .
--
फोटो क्रमांक : १८टाकळी हाजी आंबा गेला हातून
फोटो : आमदाबाद ता शिरूर येथील शेतकरी मनिषा दत्तात्रय जगताप या आंबा पिकाचे नुकसान दाखविताना .