देश नोटाबंदीचे दुष्परिणाम भोगतोय- माणिकराव ठाकरे; व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:06 AM2017-11-05T00:06:46+5:302017-11-05T00:07:01+5:30
देशाला मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ नोटाबंदी एक आर्थिक भूकंप असून, त्यामुळे विकासदरामध्ये २ टक्क्यांनी घट झाली. विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे
पुणे : देशाला मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ नोटाबंदी एक आर्थिक भूकंप असून, त्यामुळे विकासदरामध्ये २ टक्क्यांनी घट झाली. विविध विषयांवर रेखाटलेल्या व संकलित केलेल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजाचा आक्रोश दाखविण्याचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केला आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले.
प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यांनी बाळासाहेब ठाकरे कलादालनात आयोजित केलेल्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, ‘‘समाजाच्या संवेदना व आक्रोश पोहोचविण्यासाठी व्यंगचित्र प्रभावी माध्यम आहे़ नोटाबंदीच्या काळामध्ये बँकांच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी रांगा लागल्या़ अनेक नागरिक मृत्युमुखी पडले़ देशात १५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत. शेतकरी-शेतमजूर हवालदिल झाला आहे़ लघुउद्योग व मध्यम उद्योगांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ असंघटित क्षेत्रामध्ये लाखो लोकांच्या नोकºया गेलेल्या आहेत. मोदी सरकारच्या नोटाबंदी वर्षपूर्तीच्या निषेधार्थ ८ नोव्हेंबरला काँग्रेस पक्षातर्फे देशव्यापी काळा दिवस पाळला जाणार आहे.