केळवडेच्या सरपंचपदी मनीषा सोनवणे, उपसरपंचपदी सुरेखा कोंडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:46+5:302021-02-11T04:11:46+5:30

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागा जिंकल्याने या पॅनेलची एकहाती सत्ता आली आहे. या निवडणुकीत ...

Manisha Sonawane as Sarpanch of Kelwade, Surekha Konde as Deputy Sarpanch unopposed | केळवडेच्या सरपंचपदी मनीषा सोनवणे, उपसरपंचपदी सुरेखा कोंडे बिनविरोध

केळवडेच्या सरपंचपदी मनीषा सोनवणे, उपसरपंचपदी सुरेखा कोंडे बिनविरोध

Next

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागा जिंकल्याने या पॅनेलची एकहाती सत्ता आली आहे. या निवडणुकीत चार जागा बिनविरोध तर उर्वरित पाच जागांवर झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ पॅनेलने दणदणीत विजय मिळविला आहे. सरपंच पदासाठी मनीषा सोनवणे आणि उपसरपंच पदासाठी सुरेखा कोंडे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी हिरामण शेवाळे यांनी सरपंचपदी मनीषा सोनवणे व उपसरपंचपदी सुरेखा कोंडे यांची निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश बागल, बारामती लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल कोंडे, माजी सरपंच शांताराम जायगुडे, राजेंद्र कोंडे, बाळासाहेब धुमाळ, संपत कोंडे, धनाजी कोंडे, शिवाजी कोंडे, विलास मरळ, बाळासाहेब कोंडे, नंदू कोंडे, रोहिदास कोंडे, महेश मरळ, पोपट जगताप, सुभाष सोनवणे, नारायण कोंडे, संदीप कोंडे, महेश कोंडे, संतोष कोंडे आदी उपस्थित होते.

१०नसरापूर केळवडे

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांच्यासमवेत कुलदीप कोंडे व इतर.

Web Title: Manisha Sonawane as Sarpanch of Kelwade, Surekha Konde as Deputy Sarpanch unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.