मानाच्या गणपतींची मिरवणूक वेळेआधीच

By Admin | Published: September 17, 2016 12:52 AM2016-09-17T00:52:34+5:302016-09-17T00:56:18+5:30

मानाच्या गणपतींची मिरवणूक बेलबाग चौक ते टिळक चौकापर्यंत रेंंगाळली असली, तरी ही मिरवणूक यंदा २० मिनिटे आधी संपली आहे.

Manna's Ganpati procession is already ahead | मानाच्या गणपतींची मिरवणूक वेळेआधीच

मानाच्या गणपतींची मिरवणूक वेळेआधीच

googlenewsNext

पुणे : मानाच्या गणपतींची मिरवणूक बेलबाग चौक ते टिळक चौकापर्यंत रेंंगाळली असली, तरी ही मिरवणूक यंदा २० मिनिटे आधी संपली आहे. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडाच्या श्रींचे सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी तब्बल ८ तास ४५ मिनिटांनी संपली. तर २०१५मध्ये ही मानाच्या गणपतींची मिरवणूक सुमारे ९ तास ५ मिनिटे चालली होती. मात्र, मानाच्या सर्व गणपतींच्या मिरवणुकांमध्ये सुमारे एक ते दीड तासांचे अंतर पडल्याचे या मिरवणुकीत दिसून आले.
महापौर प्रशांत जगताप आणि पालकमंत्री गिरिष बापट यांच्या हस्ते पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीला कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करून सकाळी साडे दहा वाजता वैभवशाली मिरवणूकीला सुरूवात झाली. त्यानंतर मानाचा पहिला कसबा गणपती बेलबाग चौकात मिरवणूक सुरू झाल्यानंतर साडे अकराच्याच्या सुमारास बेलबाग चौकात आला. त्यानंतर या मिरवणूकीला टिळक चौकात येण्यास तब्बल साडेतीन तासांचा कालावधी लागला . अधून मधून पडणा-या पावसाच्या सरी त्यानंतर टिळक चौकापासून नटेश्वर घाटा पर्यंत विसर्जनांसाठी जाण्यास श्रींच्या मिरवणूकीला तब्बल सव्वा तास गेला. दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी मानाच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर सुमारे साडेबाराच्या सुमारास दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी बेलबाग चौकात या बाप्पांच्या मिरवणूकीत केवळ ढोल पथकेच असल्याने या मंडळाची मिरवणूक वेगाने पुढे जात होती. मात्र, तरीही कसबा गणपती टिळक चौकातून पुढे गेल्यानंतर सुमारे सव्वा तासाने ४ वाजून १० मिनिटांनी टिळक चौकात पोहचली. त्यानंतर पूढे तब्बल दिड तासांनी म्हणजे ५ वाजून ४० मिनिटांनी दुस-या मानाच्या गणपतीचे विसर्जन झाले. मानचा तिसरा गणपती गुरूजी तालीम दुपारी दिडच्या सुमारा बेलबाग चौकात आला. त्यानंतर पुढे तब्बल चार तासांतर या मंडळाची मिरवणूक साडेपाच वाजता टिळक चौकात आला. मंडळाकडून मिरवणूक मार्गावर गुलालाची उधळण करण्यात आली. त्यानंतर पुढे सुमारे तासाभराने ६ वाजून २५ मिनिटांनी मानाच्या तिस-या गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
चौथा मानाचा गणपती तुळशीबाग अडीचच्या सुमारास बेलबाग चौकात आला या मिरवणूकीस टिळक चौकात येण्यासाठी ६ वाजून १० मिनिटे लागली. पुढे ६ वाजून ५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावर मानाच्या चौथ्या गणपतीचे विसर्जन झाले. पाचवा मानचा केसरीवाडा गणपती पाऊनेचारच्या सुमारास बेलबाग चौकातून पुढे सरकला. त्यानंतर अडीच तासांनी ६ वाजून ४० मिनिटांनी टिळक चौकात दाखल झाला. ७ वाजून १५ मिनिटांनी पाचव्या मानाच्या गणपतीचेही पांचाळेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आले. 

Web Title: Manna's Ganpati procession is already ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.