मनोहरमामा भोसलेला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:34+5:302021-09-21T04:13:34+5:30

या प्रकरणातील फरार असलेल्या मनोहरमामा याचा सहकारी ओंकार शिंदे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिंदे याला ...

Manoharmama Bhoslela Court Room | मनोहरमामा भोसलेला न्यायालयीन कोठडी

मनोहरमामा भोसलेला न्यायालयीन कोठडी

googlenewsNext

या प्रकरणातील फरार असलेल्या मनोहरमामा याचा सहकारी ओंकार शिंदे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिंदे याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मात्र, या गुन्ह्यातील विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा हा अद्याप फरारी आहे.

शशिकांत खरात (रा. साठेनगर, कसबा बारामती, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. खरात यांच्या वडिलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला आहे. त्यामुळे खरात हे मनोहरमामा भोसलेच्या मौजे सावंतवाडी, गोजूबावी (ता. बारामती) मठामध्ये गेले. त्याने तो बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव केला. त्यांच्या वडिलांचा आजार बरा करतो, असे सांगत विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगनमत करून खरात यांच्याकडून २ लाख ५१ हजार ५०० रुपये उकळले. पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहरमामाला १० सप्टेंबर रोजी सालपे (जि. सातारा) येथे फार्महाऊसवर जाऊन अटक केली. त्यानंतर मनोहर भोसले याला सुरुवातीला ५, तर त्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याच्या कोठडीची मुदत रविवारी (दि. १९) रोजी संपली. न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांनी मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

...करमाळा पोलिसांनी घेतले ताब्यात

मनोहर ऊर्फ मामा भोसले याची बारामती न्यायालयाने रविवारी (दि. १९) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान, बलात्काराच्या गुन्ह्यात करमाळा पोलिसांच्या ताब्यात भोसले यास देण्यास न्यायालयाने परवानगी दिली. त्यानुसार करमाळा पोलिसांनी त्याला रविवारीच बारामती पोलिसांच्या ताब्यातून घेतले आहे.

————————————————

... उच्च न्यायालयात जाणार

मनोहर भोसले यांना रविवारी बारामती न्यायालयापुढे हजर करण्यात आले. एकीकडे शिंदे यांस अटक केली असताना पोलिसांना एकत्रित तपास करणे शक्य होते, पण त्यांनी थेट न्यायालयीन कोठडीची मागणी करणे संशयास्पद आहे. या मुद्द्यासह सालपे येथून अटक करताना सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांची पोलिसांकडून पायमल्ली झाली आहे. या मुद्द्यांसंबधी आम्ही उच्च न्यायालयात धाव घेत न्याय मागणार असल्याचे मनोहर भोसले यांच्या वकील रुपाली ठोंबरे यांनी सांगितले.

————————————

Web Title: Manoharmama Bhoslela Court Room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.