मनोज जरांगेंची आरक्षण दिंडी पुण्यात मुक्कामी, ९० एकरमध्ये नियोजन; कशी असेल पदयात्रा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 05:27 PM2024-01-22T17:27:51+5:302024-01-22T17:31:17+5:30
चंदननगर ( पुणे ): मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रांजणगावहून निघून नगररोडने कोरेगाव भिमामार्गे खराडीत मुक्काम करणार ...
चंदननगर (पुणे): मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रांजणगावहून निघून नगररोडने कोरेगाव भिमामार्गे खराडीत मुक्काम करणार आहे. तेथून ही पदयात्रा खराडी बायपास- पुणे स्टेशन- औंध गाव- रक्षक सोसायटी - काळेवाडी फाटा - डांगे चौक - चिंचवड स्टेशन - आकुर्डी - निगडी देहूरोड -(जुना एक्सप्रेस वे ने) - लोणावळा मुक्कामी जाणार आहे.
खराडीत म्हणजे पुणे शहरात येत असुन या मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त, नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने वतीने पंधराशे शौचालय, कचरा व्यवस्थानाचे नियोजन करण्यात आले आहे. मुक्कामाची सोया खराडी-वाघोलीच्या सिमेवर चोखी ढाणी रस्त्यावरील आरके फार्म येथे तब्बल नव्वद एक जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे.एकून चार जागांची निवड करण्यात आली असुन सभा,पार्कींग,जेवण,पाण्याचे टँकर सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.
नगररस्त्यावर दोन किमी आत मध्ये व्यवस्था करण्यात आल्याने नगररस्त्यावर मोठी कोंडी होणार असुन त्यासाठी पुणे शहर वाहतुक विभागाच्या वतीने एक अप्पर आयुक्त,चार उपायुक्त, आठ सहायक आयुक्त,१६ पोलिस निरिक्षक,५६ सहायक /उपनिरीक्षक आणि ५०० कर्मचारी असा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहीती पोलिय उपायुक्त विजय मगर यांनी दिली.
दरम्यान पुणे शहर वाहतुक विभागाच्या वतीने दि. २३ रोजी दुपारी ३. ०० वा पासुन आवश्यकतेनुसार अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वळवण्यात येणार आहे. तसेच पुणे शहरातील मुंबई पुणे महामार्गावरील कोल्हापूर सातारा येथून येणारी अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कात्रज खडीमशीन चौक मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रोडने केडगाव चौफुला नावे शिरूर मार्गे वळविण्यात आले आहे. त्यानंतर वाघोली लोणीकंद मार्गे अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने थेऊर फाटा सोलापूर रोड येथून वाहतूक केडगाव चौफुला नावरा मार्गे ते शिरूर आशी वळवण्यात येणार आहे.
पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी वाहने खराडी बायपास चौकातून हडपसर मार्गे केडगाव चौफुला शिरूर मार्गे नगर कडे वळवण्यात आले आहे. त्यानंतर दिनांक 24 रोजी पुणे शहरांमधून पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये यात्रा जाणार असल्याने नगर वरून येणारी पुणे शहराकडे सर्व वाहने थेऊर मार्गे सोलापूर रोडला वळवण्यात येणार आहे. वाघोली परिसरातील वाहने आवळवाडी मांजरी खुर्द मांजरी बुद्रुक केशवनगर मुंढवा चौकशी वळवण्यात येणार आहे. पुणे शहरातून अहमदनगर कडे जाणारी सर्व वाहने आळंदी रोड जंक्शन विश्रांतवाडी धानोरी लोहगाव वाघोली मार्गे अहमदनगरकडे वळवण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर पोलिस उपआयुक्त वाहतुक विभाग शशीकांत बोराटे यांनी दिली. सदर नियोजन सकल मराठा समाज पुणे शहर व जिल्हा यांच्या वतीने करण्यात येत आहे.