ससून हॉस्पिटल कामगार सोसायटीच्या चेअरमनदी मनोज सरोदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:10 AM2021-03-01T04:10:38+5:302021-03-01T04:10:38+5:30
१९४५ साली स्थापन झालेल्या या संस्थेत १५०० च्या वर सभासद होते. परंतु सभासदांच्या निवृत्ती, स्वयंनिवृत्तीनंतर सध्या १०५० ...
१९४५ साली स्थापन झालेल्या या संस्थेत १५०० च्या वर सभासद होते. परंतु सभासदांच्या निवृत्ती, स्वयंनिवृत्तीनंतर सध्या १०५० इतकेच क्रियाशील सभासद आहेत. संस्थेचे भागभांडवल महिना ५० लक्ष रुपये इतके असून, गेल्या १० वर्षांपासून संस्थेला ऑडिटमध्ये सातत्याने अ श्रेणी मिळत आहे.
कामगारांच्या कल्याणासाठी सोसायटीने अनेक कल्याणकारी योजना आखल्या असून, या वर्षी वडकीनाला या ठिकाणी २ एकर जागा खरेदी करून कामगारांच्या हक्काची कायमस्वरूपी घरे निर्माण करण्याचा संस्थेचा संकल्प आहे. त्यासंदर्भात जागेची पाहणीसुद्धा झाली आहे. लवकरच पुढची प्रक्रिया सर्वानुमते होईल, असे नवनियुक्त चेअरमन मनोज सरोदे यांनी सांगितले. सरोदे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर फौंडेशनचे संस्थापक असून यामार्फत ते रक्तदान शिबिर, क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांना मदत आणि विविध कार्यक्रम घेत असतात.